COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,54,508
Recovered:
56,99,983
Deaths:
1,16,674
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,860
684
Maharashtra
1,34,747
9,798

कारच्या धडकेत पोलिस शिपाई जखमी

वर्सोवा पोलिस ठाण्यातून ड्युटी संपवून प्रमोद हे दुचाकीहून घरी निघाले होते. प्रमोद हे घाटकोपरच्या गणेश मंदीर चौकातून जात असताना एका कारने त्यांना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की अपघातावेळी प्रमोद काही अंतरावर फेकले गेले.

कारच्या धडकेत पोलिस शिपाई जखमी
SHARES

कारनं दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार पोलिस गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी पहाटे घाटकोपर परिसरात घडली. या अपघातात वर्सोवा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस शिपाई प्रमोद देवकुळे हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी पंतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी कार चालक आमीर शेख याला अटक केली आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.दुचाकी चक्काचूर

वर्सोवा पोलिस ठाण्यातून ड्युटी संपवून प्रमोद हे दुचाकीहून घरी निघाले होते. प्रमोद हे घाटकोपरच्या गणेश मंदीर चौकातून जात असताना एका कारने त्यांना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की अपघातावेळी प्रमोद काही अंतरावर फेकले गेले. तर त्यांची दुचाकी चक्काचूर झाली. घटनास्थळी असलेल्या स्थानिकांनी बेशुद्ध अवस्थेत असलेल्या प्रमोद यांना ताताडीने रुग्णालयात हलवलं. तर पोलिस नियंत्रण कक्षाला या अपघाताची माहिती दिली. 


अतिदक्षता विभागात उपचार

या घटनेची माहिती पंतनगर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी घाव घेतली. पोलिसांनी वेगात कार चालवणाऱ्या आमीर शेख नावाच्या चालकावर गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे.  प्रमोद यांच्यावर शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती पंतनगर पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा थरारक सीसीटिव्ही व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर वायरल होत आहे.   हेही वाचा - 

फेसबुकवरील ओळख वृद्धेला पडली महागात

लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावरून महिलेला १७ लाखांचा गंडा
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा