फेसबुकवरील ओळख वृद्धेला पडली महागात

ऑगस्ट महिन्यात आरोपीने एका ऍप्लिकेशनच्या माध्यमातून महिलेला तिचे फोटो पाठवण्यास सांगितलं. सुरुवातीला महिलेने नकार दिला, मात्र नंतर विश्वासापोटी आरोपीला फोटा पाठवले. त्यानंतर नोव्हेबर महिन्यात आरोपी महिलेला भेटण्यासाठी आला. त्याने मुलाला नोकरीला लावण्यासाठी पाच लाख रुपयांचा धनादेन महिलेकडून घेतला.

फेसबुकवरील ओळख वृद्धेला पडली महागात
SHARES

अंधेरीत एका ६० वर्षीय महिलेला नग्न छायाचित्राच्या मदतीने ब्लॅकमेल करत, १२ लाखांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. काही महिन्यांपूर्वी फेसबुकवरून या महिलेची एका तरुणाशी ओळख झाली होती. याप्रकरणी दुबईत राहणा-या दांपत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ऑनलाईन चॅटिंग

अंधेरी परिसरात राहणाऱ्या या महिलेची जानेवारी महिन्यात ४० वर्षीय आरोपीसोबत फेसबुकवर ओळख झाली होती. त्यावेळी आरोपीने आपण दुबईतील बँकेत लेखापाल असल्याचे महिलेला सांगितलं होत.. या ओळखीतून महिलेने तिच्या मुलाला दुबईत नोकरीला ठेवण्याची विनंती आरोपीला केली. आरोपीनेही महिलेला तसे आश्वासन दिले. त्यानंतर दोघांनी ऑनलाईन चॅटिंग सुरू केली. महिलेला विश्वासात घेत कालांतराने दोघेही अश्लील विषयांवर बोलू लागले.


पाच लाखांचा धनादेश

ऑगस्ट महिन्यात आरोपीने एका अॅप्लिकेशनच्या माध्यमातून महिलेला तिचे नग्न छायाचित्र पाठवण्यास सांगितले. सुरुवातीला महिलेने नकार दिला, मात्र कालांतराने विश्वासापोटी तिने आरोपीला नग्न छायाचित्र पाठवले. त्यानंतर नोव्हेबर महिन्यात आरोपी महिलेला भेटण्यासाठी आला. त्याने मुलाला नोकरीला लावण्यासाठी पाच लाख रुपयांचा धनादेश महिलेकडून घेतला.


आणखी पैशांची मागणी

त्यानंतर आरोपीच्या पत्नीने दूरध्वनी करून महिलेला धमकावण्यास सुरूवात केली. माझ्या पतीविरोधात प्रेमप्रकरण सुरू असून तू त्याला नग्न छायाचित्र आणि चित्रफीत पाठवली आहे. ती तुझा पती आणि नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देऊन महिलेने १२ लाख रुपये महिलेकडून उकळले. तेवढ्यावरच ती थांबली नाही, तर तिने आणखी पैशांची मागणी सुरूच ठेवली. त्यानंतर मानसिक दबावाखाली आलेल्या महिलेने सर्व प्रकार तिच्या बहिणीला सांगितला. त्यानंतर पीडित महिलेने याप्रकरणी अंधेरी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी खंडणी व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.




हेही वाचा -

लाेकलमध्ये महिलांचा विनयभंग करणाऱ्या विकृताला अटक

यशराज कंपनीला गंडा घालणाऱ्यांना अटक



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा