लाेकलमध्ये महिलांचा विनयभंग करणाऱ्या विकृताला अटक

लोकलमधील महिला प्रवाशांची संख्या वाढत असून एकूण प्रवाशांच्या तुलनेत महिलांचं प्रमाण ४० टक्के इतकं वाढलं आहे. महाविद्यालयीन तरुणी, नोकरदार महिला मोठ्या संख्येने रेल्वेचा प्रवास करतात. मात्र हाच प्रवास महिलांना दिवसेंदिवस खडतर आणि असुरक्षित वाटू लागला आहे.

लाेकलमध्ये महिलांचा विनयभंग करणाऱ्या विकृताला अटक
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर असतो. महिलांच्या डब्यात गर्दुले, विकृत शिरण्यापासून महिला प्रवाशांशी अश्लील वर्तन करणं आणि विनयभंगासारख्या अनेक तक्रारी सातत्यानं समोर येत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी भूज एक्स्प्रेसमध्ये एका महिलेची हत्याही झाली होती. त्यामुळे महिला प्रवाशांना नेहमीच जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यातच गर्दीच्या वेळेत महिलांच्या डब्यात घुसून त्यांना स्पर्श करणाऱ्या एका तरुणास वडाळा पोलिसांनी अटक केली आहे.


गर्दीचा गैरफायदा  

लोकलमधील महिला प्रवाशांची संख्या वाढत असून एकूण प्रवाशांच्या तुलनेत महिलांचं प्रमाण ४० टक्के इतकं वाढलं आहे. महाविद्यालयीन तरुणी, नोकरदार महिला मोठ्या संख्येने रेल्वेचा प्रवास करतात. मात्र हाच प्रवास महिलांना दिवसेंदिवस खडतर आणि असुरक्षित वाटू लागला आहे.

मुंबईत गर्दुले आणि स्त्रीलपंटामुळे महिलांना नाहक त्रासाला सामोरे जावं लागत आहे. गर्दीचा फायदा घेऊन एका १८ वर्षीय तरुणीच्या अंतवस्त्राच्या आत हात टाकण्याचा प्रयत्न एका विकृताने केल्याचा प्रकार घडला. वेळीच ही बाब तरुणीच्या लक्षात आल्यानंतर तिने त्याला रंगेहाथ पकडले. स्थानकावरील महिलांच्या मदतीनं तरुणीनं आरोपीला वडाळा पोलिसांच्या ताब्यात दिलं.


विकृत तरूण

पीडित तरुणी ही पनवेनहून कुर्ला स्थानकावर उतरली असताना तिच्यासोबत हा प्रकार घडला. पोलिस चौकशीत शाहदाब मो. रईस शेख (२६) असे या विकृताचं नाव असल्याचं पुढं आलं आहे. विक्रोळी परिसरात राहणारा शाहदाब खासगी ठिकाणी नोकरी करत असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. या प्रकरणी वडाळा पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे



हेही वाचा

चिंचपोकळी परिसरात चौथ्या मजल्यावरून पडून दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू

प्रवाशांना बिस्किटातून गुंगीचं औषध देऊन लूट; दोघांना अटक




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा