सोनसाखळी चोरांना पकडणाऱ्या पोलिसांचा सत्कार

Goregaon
सोनसाखळी चोरांना पकडणाऱ्या पोलिसांचा सत्कार
सोनसाखळी चोरांना पकडणाऱ्या पोलिसांचा सत्कार
सोनसाखळी चोरांना पकडणाऱ्या पोलिसांचा सत्कार
See all
मुंबई  -  

वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढणाऱ्या दोघांना गोरेगाव पोलिसांच्या बीट मार्शलने पकडले आणि त्यांच्याकडील चेन जप्त केली. त्यामुळे पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने यांनी दोन पोलिसांचा सत्कार केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामीलाबेन (60) या गोरेगाव (प.) येथील ललित हॉटेलजवळून जात होत्या. तेव्हा दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी त्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून पळ काढताना महिलेने आरडाओरड केली. तेव्हा तिथून जात असलेल्या बीट मार्शल 2 ने त्या दोघांनाही पकडून पोलीस ठाण्यात आणले.पोलिसांच्या चौकशीनंतर त्यांचे नाव इरफान वाजगरे आणि जफर मोहम्मद शेख असून ते दोघेही मुंब्र्यातले राहणारे असल्याचे समोर आले आहे. हे दोघेही मुंबई उपनगरात येऊन सोनसाखळी चोरी करायचे अशी माहिती देखील पोलिसांनी दिली.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.