100 नंबरवर पोलिसांनाच अश्लील कॉल्स

 

मुंबई - आपल्याला अश्लील कॉल्स आले की आपण 100 नंबरवर कॉल करतो किंवा पोलिसांकडे धाव घेतो. पण पोलिसांनाच हे अश्लील कॉल आले तर? आश्चर्य वाटलं ना हे ऐकून... अश्लील कॉल तेही चक्क पोलिसांना. पण होय हे खरं आहे. पोलीस नियंत्रण कक्षात सध्या खळबळ माजलीय ती या अश्लील कॉल्समुळे. 100 नंबरवर एकामागून एक सतत कॉल्स पोलिसांना येऊ लागलेत. अतिशय अश्लील शब्दात नियंत्रण कक्षातील महिला पोलिसांशी संवाद केला जातोय. महिलांनाच नव्हे तर पुरुषांनाही या इसमानं सोडलं नाही. पोलिसांच्या पत्नी, मुलींबद्दलही इतक्याच घाणेरड्या आणि अश्लील भाषेत हा बोलतोय. मुंबई पोलिसांच्या १०० नंबरवर 125 कॉल्स आल्यानं पोलीसदेखील चक्रालावून गेलेत. याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. याप्रकरणाचा तापास करत असल्याची माहिती मुंबई पोलीस प्रवक्ते डीसीपी अशोक दुधे यांनी दिलीय.

Loading Comments