गँगस्टर एजाज लकडावालाच्या हस्तकांना बेड्या

  Pali Hill
  गँगस्टर एजाज लकडावालाच्या हस्तकांना बेड्या
  मुंबई  -  

  मुंबई - गँगस्टर एजाज लकडावालाच्या हस्तकांचा खंडणीविरोधी पथकानं पर्दाफाश केलाय. पश्चिम उपनगरातील बांधकाम व्यवसायिक दोन कोटींची खंडणी देत नसल्यानं, त्याचा खात्मा करण्याच्या तयारीत हे गँगस्टर आहेत. याप्रकरणी सागर इंदुलकर (25), अंकुश तायडे (21) सागर चव्हाण (24) यांना अटक केलीय. त्यांच्याकडून एक पिस्तुल मॅगेझीनसह पाच जिवंत काडतुसे, सुरा, दुचाकी आणि मोबाइल जप्त केलेत.

  पश्चिम उपनगरातील एका बांधकाम व्यावसायिकाला गेल्या अनेक दिवसांपासून गँगस्टर एजाज लकडावालाकडून दोन कोटींच्या खंडणीसाठी धमकी येत होती. या धमक्यांना भिक न घालत बांधकाम व्यवसायिकानं थेट पोलिसांना याची तक्रार केली. यावरून लकडावाला चांगलाच संतापला होता. त्यानं तिघांना या व्यावसायिकाला मारण्याची सुपारी दिली होती. हे तिघे व्यवसायिकाला उडवण्याच्या तयारीत असतानाच यांच्या कटाची माहिती खंडणीविरोधी पथकाला लागली आणि त्यांना अटक करण्यात आली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.