पोलिसांना सापडली मागच्या सीटवर डेडबॉडी!

 Dahisar East
पोलिसांना सापडली मागच्या सीटवर डेडबॉडी!
Dahisar East, Mumbai  -  

दहिसर - सँट्रो कारमध्ये एक मृतदेह आढळल्याची घटना दहिसर (पू) इथल्या एसव्ही रोडवरील कृष्णा टॉवर परिसरात घडली आहे. त्यामुळे तिथल्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार बोरीवलीच्या दिशेकडे जाणाऱ्या एका सँट्रो कारमधल्या मागच्या सीटवर कुणीतरी झोपलेलं असल्याची सूचना दहिसर पोलिसांना मिळाली होती.दहिसर पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत कृष्णा टॉवरच्या समोर उभ्या असलेल्या कारची तपासणी केली. तेव्हा त्या कारच्या मागच्या सीटवर कुणीतरी झोपलेल्या अवस्थेत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आले. पोलिसांनी डॉक्टरांना बोलावून तपासणी केली असता डॉक्टरांनी त्या व्यक्तीला मृत घोषित केले. 

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मृत व्यक्तीचं नाव भरत विष्णू प्रसाद असून ते कांदिवलीत (प.) इथल्या चारकोपमधील रहिवासी होते. याप्रकरणाचा पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत.

Loading Comments