आरे कॉलनीत सापडला तरुणाचा मृतदेह

आरे कॉलनी - गोरेगावच्या आरे कॉलनीत एका 23 वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला. ब्रेडन गोन्सालविस असं या तरुणाचं नाव आहे. 19 डिसेंबर पासून ब्रेडन गायब झाला होता. याबाबतीत ब्रेडनच्या कुटुंबियांनी दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये गायब झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलीस ब्रेडनचा तपास करत होते. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि ब्रेडनचा नग्न अवस्थेतला मृतदेह ताब्यात घेतला. ब्रेडनचं डोकं शरीरापासून वेगळं केलं गेलंय. पोलिसांच्या माहितीनुसार ब्रेडन गोरेगावच्या पद्मावमी सोसायटीत राहत होता. या सर्व प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. तसंच क्राईम ब्रांच शाखा 11 आणि 12 या ही तपास करत आहेत. या प्रकरणाचा ठोस असा पुरावा अजूनही हाती लागला नसल्याचं पोलीस सांगत आहेत.

Loading Comments