कुरारमध्ये गुन्हेगारीचा वाढता आलेख


कुरारमध्ये गुन्हेगारीचा वाढता आलेख
SHARES

मागील काही दिवसांपासून कुरारमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वी या परिसरात राहणाऱ्या एका टीव्ही अभिनेत्रीला एका व्यक्तीने अश्लील मेसेज पाठवून हैराण करून सोडले होते. सोमवारी याच परिसरात एका व्यक्तीची हत्या झाली होती. आणि आता मंगळवारी हफ्ता वसुलीच्या घटनेमुळे पोलिसंमोर एक नवीन आव्हान उभे राहिले आहे.

मुंबईच्या कुरार पोलिसांनी 40 वर्षाच्या एका व्यक्तीविरोधात हफ्तावसुलीचा गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, फिर्यादी महेश पाटील (45) यांनी आरोप केला आहे की, आरोपी त्यांच्याकडून दर महिन्याला 10 हजार रुपयांच्या हफ्त्याची मागणी करत होता. तसेच हफ्ता न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देत होता. 

आरोपी हफ्ता वसुलीसाठी शनिवारी फिर्यादीच्या इमिटेशन ज्वेलरीच्या कारखान्यावर आला. त्यावेळी महेश पाटील आणि आरोपी या दोघांमध्ये बाचाबाची झाली. तेव्हा आरोपीने महेश यांना जिवे मारण्याची धमकी देत मारहाणही केली. त्यानंतर महेश यांनी याप्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरोधात तक्रार नोंदवली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा