• जीवनदान देणाऱ्या महिला डॉक्टरची हत्या
SHARE

विले पार्ले - विले पार्लेत झालेल्या महिला फिजीओथेरेपीस्टच्या हत्येनंतर परिसरात खळबळ उडाली. 25 वर्षीय श्रद्धा पांचाळची गळा आवळून हत्या करण्यात आली. श्रद्धाच्या हत्येप्रकरणी अद्यापही ठोस असा काहीच पुरावा लागलेला नाही. पण ज्या मित्र-मैत्रिणींना ती ओळखत होती, त्यांची पोलीस कसून चौकशी करतायत. दरम्यान पोस्टमार्टमनंतर या प्रकरणी पोलिसांनी बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केलाय.श्रद्धा ज्या खोलीत रात्री 3.30 च्या सुमारास झोपली होती, त्या खोलीतून अचानक धूर येऊ लागला. पाहणी केली असता खोलीत विवस्त्र अवस्थेत गळा आवळलेल्या स्थितीत श्रद्धाचा मृतदेह आढळला आणि पायाखालची जमीनच सरकली. श्रद्धाची ज्या क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आली, त्यावरुन हत्या करणारी व्यक्ती जवळचीच असल्याचा पोलिसांचा संशय आहे. हा गुंता अद्याप सुटला नसला तरीही लवकरात लवकर गुन्हेगाराचा छडा लावू असा तपास अधिकाऱ्यांचा दावा आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या