खारदेवनगर - सार्वजनिक शौचालयात महिलेबाबत अश्लील मजकूर लिहणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीविरोधात गोवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदर महिला ही खारदेवनगर परिसरात राहत असून याच परिसरातील शौचालयांमध्ये तिच्याबाबत अश्लील मजकूर लिहलं जात होतं. याबाबत तिनं अनेकदा पोलिसांना पत्रव्यवहार केला होता, मात्र वारंवार हे प्रकार घडतच असल्यानं मंगळवारी परिसरातील महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.