अभिनेत्याची मर्सिडीज चोरणारा अटकेत


  • अभिनेत्याची मर्सिडीज चोरणारा अटकेत
SHARE

चारकोप - स्टाइल, एक्सस्क्यूज मी अशा चित्रपटांत काम करणारा अभिनेता साहिल खानची मर्सिडीज चोरणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. आफताब पटेल असं या आरोपीचं नाव आहे. साहिलची बहिण शाइस्तानं 7 ऑक्टोबरला मर्सिडीज विकण्यासाठी ऑनलाइन जाहिरात दिली होती. ती जाहिरात पाहून आफताबनं शाइस्ताशी संपर्क साधला. दोघांनी भेटून मर्सिडीजचा सौदा 42 लाखांत पक्का केला. आफताबने पाच हचार रुपये दिले आणि उद्या सगळे पैसे देऊन गाडी घेऊन जातो, असं सांगितलं. पण त्याच दिवशी सायंकाळी आफताब शाइस्ताच्या घरी पुन्हा गेला आणि त्यानं टेस्ट ड्राइव्ह हवी असल्याचं सांगितलं. शाइस्तानं किल्ली दिल्यावर गाडी घेऊन गेलेला आफताब खूप वेळ परत आला नाही आणि त्याचा मोबाइलही बंद असल्याचं पाहून फसवणूक झाल्याचं लक्षात आलं आणि तिनं चारकोप पोलिसांकडे तक्रार केली. चारकोप पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे मिरारोडहून आफताबला अटक केली. त्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या