नैराश्येतून पोलिस नाईकाची आत्महत्या

झिंबल हे नायगाव येथे पोलीस नाईक पदावर कार्यरत होते.त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.

नैराश्येतून पोलिस नाईकाची आत्महत्या
SHARES

चेंबूर परिसरात राहणाऱ्या ४५ वर्षीय पोलिस नाईकाने राहत्या घरी नैराश्येतून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. विलास झिंबल असे या मृत पोलिसाचे नाव आहे. झिंबल हे नायगाव येथे पोलीस नाईक पदावर कार्यरत होते.त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. या प्रकरणी गोवंडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरु आहे.

हेही वाचाः- Ganesh Festival 2020: गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात चेकपोस्ट तयार, दीड लाख लोकं येण्याची शक्यता

 खारदेव नगरातील हनुमान मंदिरालगत राहत्या घरी गुरुवारी विलास जिबल यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.दुपारच्या वेळी त्यांची पत्नी परिसरातच कामानिमित्त गेल्यामुळे ते घरी एकटेच होते. सायंकाळी त्या परत आल्या तेंव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता.तो उघडण्यासाठी त्यांनी दरवाजावर हाताने वाजवले तसेच जिबल यांच्या मोबाईलवर फोन केला.फोनचा आवाज येत असूनदेखील तो उचलत नसल्यामुळे त्यांना संशय आला.शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला.त्यावेळी ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले होते. माहिती मिळताच गोवंडी पोलीस त्याठिकाणी दाखल झाले व त्यांनी तपासाला सुरुवात केली.जिबल यांना रक्तदाबाचा त्रास होता व कोरोना साथीमुळे ते तणावात असल्याचे तपासात समोर आले आहे.त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही.त्यांची दोन्ही मुले गावी असल्यामुळे ते सपत्नीक खारदेव नगर येथील घरी वास्तव्यास होते.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा