पोलिसच पोलिसाच्या शोधात

Virar
पोलिसच पोलिसाच्या शोधात
पोलिसच पोलिसाच्या शोधात
See all
मुंबई  -  

कांदिवलीच्या समतानगरमध्ये 2008 पासून कार्यरत असलेले 28 वर्षांचे सुवर्णा बाबू ठोकरे गेल्या काही दिवसांपासून पोलिस ठाण्याच्या चकरा मारत आहेत. वास्तवात सुवर्णा बाबू ठोकरे यांची लहान बहीण सुनीता ठोकरे ही अंधेरीच्या मरोळ पोलिस मुख्यालयात पोलिस शिपायाच्या पदावर तैनात होती. सुवर्णा ठोकरे हे त्यांची लहान बहीण सुनिता ठोकरे आणि मोठा भाऊ सुरज ठोकरे यांच्यासोबत विरारच्या लंबोदर अपार्टमेंटमध्ये राहत होते.

सुनीता ठोकरे यांनी गावी जाण्यासाठी 10 दिवसांची सुट्टी घेतली होती. सुनीता ही तिच्या भावासोबत गावी जाण्यासाठी घरात सामानांची पॅकिंग करत होती. काही वेळानंतर सुनिता सामान खरेदी करण्यासाठी घरातून खाली उतरली. पण बराच वेळ झाला तरी ती परत आली नाही. त्यामुळे सुवर्णा यांनी सुनीताबद्दल शेजाऱ्यांकडे विचारणा केली. पण त्यांनाही त्याबद्दल काहीच माहीत नव्हते. शेवटी सुवर्णा यांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली. हा संपूर्ण प्रकार 16 मे रोजी घडला.

पण एक दिवसांनंतर म्हणजेच 17 मे रोजी सुवर्णाच्या मोबाईलवर अहमदाबादहून एका टॅक्सीचालकाने फोन केला. तेव्हा त्या टॅक्सीचालकाने दिलेली माहिती सर्वांनाच गोंधळात टाकणारी होती. तो म्हणाला सुनिका ही आपल्या टॅक्सीत बसली होती, ती विचित्र पद्धतीने बोलत होती. संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर सुनिताचे नातेवाईक बिपीन हे खासगी गाडीने अहमदाबादला गेले. तेव्हा, सुनीताची मानसिक स्थिती ठीक नाही, ती चिंतीत होती, अशी माहिती त्या टॅक्सीचालकाने दिली.

पण कुटुंबीयांच्या म्हणण्याप्रमाणे पोलिसांची वेळेवर मदत मिळाली असती तर कदाचित सुनीता कुठे आहे याची माहिती आतापर्यंत मिळाली असती. पण पोलिस निष्काळजीपणा करत आहेत असा आरोपही त्यांनी केला.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.