म्हणून पोलिस शिपायाची बापानेच केली हत्या

या हत्याकांडाला कौटुंबिक वादाची किनार असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.

म्हणून पोलिस शिपायाची बापानेच केली हत्या
SHARES
नशेच्या आहारी गेलेल्या पोलिस शिपायाची त्याच्याच वडिलांनी हत्या केल्याची धक्कादायकघटना  पवई परिसरात उघडकीस आली आहे. हरीश गलांडे (40) असे या मृत शिपायाचे नाव आहे. या प्रकरणी पवई पोलिसांनी बापाला अटक केली आहे. या हत्याकांडाला कौटुंबिक वादाची किनार असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. 

पवईतील पंचकुटीर येथील गणेश नगर येथे हरीश आई-वडील, पत्नी आणि मुलांसोबत राहत होता. अंधेरीच्या रेल्वे पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला हरीश नशेच्या आहारी गेला होता. त्यामुळे नशेत त्याचे कुटुंबातील सदस्यांसोबत वारंवार खटके उडाचे. हरीशच्या या दररोजच्या नाटकामुळे घरातील शांतता ही भंग झाली होती. त्यातच हरीश कर्जात बुडाला होता.आर्थिक अडचणीॆमुळे घराबाहेर देणे कऱ्यांची रिघ लागलेली असायची. दारूच्या नशेत तो सतत कुटुंबीयांना त्रास देत असल्यामुळे वडील गुलाब (65 वय) कंटाळले होते. दरम्यान, सोमवारी रात्री हरीश दारूच्या नशेत घरी आला आणि त्याने पत्नी आणि आई-वडिलांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. 

या वादातून हरीशने वडिलांच्या दिशेने काचेची बाटली भिरकावली. त्यामुळे संतापलेल्या वडिलांनी हरीशच्या डोक्‍यात कोयत्याने घाव घातला. हरीश रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यावरही त्यांनी हरीशवर वार केले. या घटनेची माहिती मिळताच पवई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गुलाब यांना ताब्यात घेतले आणि जखमी हरीश गलांडेला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्‍टरांनी हरीशला मृत घोषित केले. या प्रकरणी वडील गुलाब यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केल्याची माहिती पवई पोलिसांनी दिली. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा