कोरोनाच्या नावावर औषध विकणाऱ्या 2 डॉक्टरांवर गुन्हा

दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे असल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी भिती आहे. नागरिकांच्या या भितीचा फायदा घेत वसईतील दोन डॉक्टर फसवणूक करत असल्याचं समोर आलं आहे.

कोरोनाच्या नावावर औषध विकणाऱ्या 2 डॉक्टरांवर गुन्हा
SHARES

कोरोना विषाणू वेगाने पसरत आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत  आहे. त्यामुळे असल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी भिती आहे.  नागरिकांच्या या भितीचा फायदा घेत वसईतील दोन डॉक्टर फसवणूक करत असल्याचं समोर आलं आहे. या डॉक्टरांनी आमच्याकडे कोरोनावर औषध असल्याचा दावा केला आहे. तसी जाहीरातही त्यांनी केली आहे. त्यामुळे पोलिसांनी या दोन्ही डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला आहे.

नागरिकांची फसवणूक होत असल्यामुळे सध्या राज्यात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार कोरोनाविषयी अफवा पसरवण्यास प्रतिबंध केला आहे.  कोरोनावरील औषध आमच्याकडे उपलब्ध असल्याचा दावा वसईतील या डाॅक्टरांनी केला होता. त्यानुसार  डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली. कोरोना विषाणूवर आमच्या येथे उपचार केले जातील असा दावा आतापर्यंत अनेकांनी केला आहे.

भिवंडीतील एका गादी विक्रेत्यावरही पोलिसांनी खोटी जाहीरात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  अरिहंत नामक गादीवर झोपल्यास कोरोना विषाणूची लागण होत नाही अशी जाहिरात वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आली होती. कोरोनाचा फायदा उठवण्यासाठी अशी खोटी जाहीरात करणाऱ्या कंपनीविरोधात भिवंडी येथील नारपोली पोलीस ठाण्यात  आरोग्य अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी तालुक्यातील कशेळी आणि वळ या ग्रामपंचायत क्षेत्रातील अरीहंत मेट्रेस या विक्रेत्याने ‘अँटी कोरोना व्हायरस मेट्रेस’ ही 15 हजार रुपयांची गादी विक्रीस आणली. तसेच त्यावर झोपल्यास कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होत नाही अशी फसवी जाहिरात मुंबई समाचार या गुजराती दैनिकात 13 मार्चच्या अंकात प्रकाशित करण्यात आली होती.



हेही वाचा -

Coronavirus Updates: पश्चिम रेल्वेची एसी लोकल बंद

Coronavirus : क्वारंटाईनचा सल्ला दुर्लक्षित करून चौघा तरूणांचा ट्रेनमधून प्रवास




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा