सुशांत आत्महत्या प्रकरणात आणखी दोन अभिनेत्यांसह एका अभिनेत्रीचा जबाब नोंदवणार

आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात १६ जणांचे जबाब नोंदवलेले आहेत. तसेच पोलिस सुशांतचा मोबाईल ही न्याय वैदयकिय प्रयोग शाळेत तपासण्यासाठी पाठवणार असल्याचे कळते.

सुशांत आत्महत्या प्रकरणात आणखी दोन अभिनेत्यांसह एका अभिनेत्रीचा जबाब नोंदवणार
SHARES
सुशांतसिंग आत्महत्येप्रकरणात पोलिसांनी सुशांतने लिहिलेल्या ५ दैनदिन डायऱ्यांची झाडाझडती सुरू केली असतानाच, पोलिसांनी शुक्रवारी दोन अभिनेत्यांसह एका अभिनेत्रीला चौकशीसाठी बोलावले आहे. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात १६ जणांचे जबाब नोंदवलेले आहेत.  तसेच पोलिस सुशांतचा मोबाईल ही न्याय वैदयकिय प्रयोग शाळेत तपासण्यासाठी पाठवणार असल्याचे कळते. 
 
अभिनेता सुशांत सिंगच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये घराणेशाही सुरू असल्याच्या वावड्या उठू लागल्या, त्या पार्श्वभूमिवर पोलिसांनी सुशांतने आतापर्यंत साइन केलेल्या विविध कंपन्यांकडे कॉन्ट्रॅक्टची प्रत सादर करण्याचे निर्देश दिले आहे. त्यातून पोलिसांना सुशांतच्या आत्महत्येमागील कारण कळण्यास मदत होऊ शकते असे बोलले जाते. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी गुरूवारी याप्रकरणी रिया चक्रवर्तीसोबत पब्लिक रिलेशन मॅनेजर आणि सुशांतचा व्यावसायिक मॅनेजर यांचा जबाब नोंदवला. या दोघांच्याही जबाबात काही विशेष माहिती मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, रियाकडून सुशांतबद्दल सविस्तर माहिती घेण्य्ाात आली आहे. पोलिसांनी सुशांतचे वडील आणि दोन बहिणी, कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्रा, नोकर अशा 16 जणांचा जबाब नोंदवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच डाय-याही हस्तगत केल्या असून त्यांची तपासणी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.तर दुसरीकडे सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासात दिवसागणिक नवी माहिती समोर येत आहे. 
 
या आत्महत्येप्रकरणी आता बाॅलिवूडमधील दोन मोठ्या अभिनेत्यासह एका अभिनेत्रीचे नाव समोर आले आहे. यामुळे पोलिसांनी या तिघांना चौकशीसाठी नोटीस पाठविली आहे.  हे दोन्ही स्टार सुशांत सिंह राजपूत याच्या करिअरशी संबंधित असल्याची माहिती आहे. त्याचप्रमाणे, बॉलिवूड अभिनेत्यांसोबतच 3 प्रॉडक्शन प्रमुखांची देखील चौकशी होणार आहे. बॉलिवूडमधील काही बॅक स्टेज कलाकारही चौकशी यादीत आहेत. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणातील चौकशीसाठी 3 विशेष टीम तयार करण्यात आल्या आहेत. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध् चेहरे समोर येऊन बोलू लागले आहेत. अशातच सोनू निगम यानेही एक खळबळजनक दावा केला आहे. फिल्म इंडस्ट्रीमधील एका बड्या कंपनीमुळे अनेक गायक आत्महत्येचा पर्याय स्वीकारू शकतात, असे सोनू निगमने म्हटले आहे. 
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा