SHARE

कांदिवली - गरीबीला कंटाळून 11 दिवसांच्या पोटच्या पोराला आई-वडिलांनी दर्ग्यात सोडून पळ काढला. त्यानंतर कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बाळ हरवल्याची खोटी तक्रार दाखल केली. पण पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर सत्य समोर आलं.

शनिवारी रात्री हिना आणि साहिल हे दांमपत्य माहिम दर्ग्यात आले होते. शौचालयाला जायचे आहे अशी बतावणी करून दोघांनी बाळाला दर्ग्याच्या सुरक्षा रक्षकाकडे सोपवले आणि तिकडून पसार झाले. खूप वेळ दोघे आले नाही तेव्हा सुरक्षा रक्षकाने सर्व प्रकार दर्गा ट्रस्टीला सांगितला. ट्रस्टीने बाळाला माहिम पोलिसांना सुपूर्द केले.

विशेष म्हणजे बाळाला दर्ग्यात सोडून आई-वडिलांनी पोलीस स्टेशनकडे धाव घेतली. बाळ हरवल्याची खोटी तक्रार दोघांनी दाखल केली. पण पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा सत्य समोर आलं. गरीबीला कंटाळून हे कृत्य केल्याचं दोघांनी कबूल केलं. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला नाहीय. हे दांम्पत्य कांदिवलीतल्या गौसा मस्जिद जवळ राहतात. पण पोलिसांनी सध्या बाळाला माटुंग्याच्या स्वामी श्रद्धानंद आश्रममध्ये ठेवलंय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या