सचिन वाझेंच्या प्रॅडोसहीत २ मर्सिडिज जप्त

एनआयएने वाझेंकडून आतापर्यंत पाच गाड्या जप्त केल्या आहेत. गुरुवारी दुपारी एनआयएने दुसरी मर्सिडीज जप्त करुन ती कार्यालयात आणली.

सचिन वाझेंच्या प्रॅडोसहीत २ मर्सिडिज जप्त
SHARES

मुकेश अंबांनी यांच्या घराबाहेरील कारमधील स्फोटक प्रकरणी आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी अटकेत असलेले पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची एनआयएकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.

या चौकशीत वाझेंच्या मालमत्तेविषयीही माहिती समोर येत आहे. एनआयएने वाझेंकडून आतापर्यंत पाच गाड्या जप्त केल्या आहेत. गुरुवारी दुपारी एनआयएने दुसरी मर्सिडीज जप्त करुन ती कार्यालयात आणली. यापूर्वी एनआयएने एक स्पॉर्पिओ, इनोव्हा, प्रॅडो आणि एक मर्सिडीज गाडी जप्त केली आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून या गाडीची तपासणी सुरु आहे.

एनआयए ने पहिल्यांदा स्कॉर्पिओ ताब्यात घेतली. त्यानंतर इनोव्हा गाडी ताब्यात घेतली. त्यानंतर सचिन वाझेंना अटक करण्यात आली. पुढे सचिन वाझेंच्या चौकशीनंतर एक मर्सिडीज ताब्यात घेण्यात आली. ती गाडी सीएसएमटी जवळच्या एका पार्किंगमधून ताब्यात घेण्यात आली होती. त्यानंतर आता आणखी एक मर्सिडीज ताब्यात घेतली आहे. आधीच्या मर्सिडीजमध्ये  पैसे मोजण्याचे मशीन, ५ लाख रुपये रोख सापडले होते. 

एनआयएने आतापर्यंत पाच गाड्या ताब्यात घेतल्या आहे. एक ट्रॅडो गाडी वाझेंच्या कपाऊंडमधून ताब्यात घेतल्याचं सांगण्यात येत आहे. ही गाडी अजून एनआयए कार्यालयात आणली गेलेली नाही. शिवाय एक स्कोडा कारही एनआयएच्या रडारवर आहे.

एनआयएने ताब्यात घेतलेल्या टोयोटा प्रॅडो गाडीची किंमत ९६ लाख ३० हजारांपासून सुरु होते. ऑटोमेटिक गिअर सिस्टिम आणि ७ सीटर असलेल्या या  कारमध्ये ७ एअरबॅग्ज आहेत.



हेही वाचा -

धारावीत स्वतंत्र लसीकरण केंद्र

१३४ खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी मान्यता

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा