दहिसरच्या प्रकाश बारवर छापा

 Dahisar
दहिसरच्या प्रकाश बारवर छापा
Dahisar, Mumbai  -  

डान्स बारचा परवाना नसतानाही बेकायदेशीररित्या डान्स सुरू ठेवणाऱ्या दहिसर चेकनाक्यासमोरील प्रकाश बारवर पोलिसांनी शुक्रवारी छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी चार बारबाला, दोन वेटर, एक कॅशिअर, एक मॅनेजर आणि 15 ग्राहकांना ताब्यात घेतले. दहिसर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर ग्राहकांना समज देऊन सोडण्यात आले तर कॅशिअर, मॅनेजर आणि वेटर्सना बोरीवली न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या चौघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

चेकनाक्यासमोरील प्रकाश बारमध्ये परवाना नसतानाही डान्स सुरू असल्याची माहिती दहिसर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी गुरूवारी रात्री एका ग्राहकाला पाठवले. या ग्राहकाने बारमध्ये चालणाऱ्या डान्सची एक मोबाइल क्लिप बनवून ती पोलिसांना पाठवली. ही क्लिप हाती पडताच दहिसर पोलिसांनी थेट बारवर छापा टाकला.

या छाप्यात पोलिसांना चार बारबाला डान्स करताना आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी या बारबालांसहित दोन वेटर, एक कॅशिअर, एक मॅनेजर आणि 15 ग्राहकांना ताब्यात घेतले. कॅशिअर, मॅनेजर आणि वेटर्सना बोरिवली न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून ग्राहकांना समज देऊन सोडून देण्यात आले. तर बारबालांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली.

Loading Comments