सततच्या तुलनेमुळे प्रीतीवर अॅसिड हल्ला


सततच्या तुलनेमुळे प्रीतीवर अॅसिड हल्ला
SHARES

प्रीती राठी अॅसिड हल्ल्या प्रकरणातील आरोपी अंकुर पनवारला मुंबई सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली. प्रीती राठीवरील हल्ला हा दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा आहे, त्यामुळे आरोपीला फाशीच व्हावी, असा युक्तीवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला होता. या प्रकरणी मंगळवारी मुंबई सत्र न्यायालयानं आरोपी अंकुर पनवार दोषी असल्याचा निकाल दिला होता.  अंकुर पनवार आणि प्रीती राठी हे लहानपणापासून मित्र होते. अंकुरच्या घरी प्रीतीचं खूप कौतुक व्हायचं. तिला चांगली नोकरी लागली होती. पण अंकुर बेरोजगार होता. यावरून अंकुरच्या घरचे त्याला वारंवार बोलत. याचाच राग अंकुरच्या मनात निर्माण होऊ लागला. त्यात अंकुरनं प्रीतीला घातलेली लग्नाची मागणी प्रीतीनं धुडकावली. याचाच राग आल्यानं अंकुरनं प्रीतीवर अॅसिड हल्ला केला. यामध्ये उपचारादरम्यान मुंबईत प्रीतीचा मृत्यू झाला होता.
नेमका कसा झाला हल्ला ?
2 मे 2013 - नौदलाच्या रुग्णालयात नोकरीसाठी रुजू होण्यासाठी प्रीती राठी मुंबईत आली
2 मे 2013ला गरीबरथ एक्सप्रेसमधून प्रीती वांद्रे टर्मिनस स्थानकात  कुटुंबियासमवेत उतरली.
त्याच ट्रेनमधून आलेल्या अंकुरनं तिच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकले
अ‍ॅसिड हल्ल्यात प्रीतीनं डावा डोळा गमावला, तर उजव्या डोळ्याची दृष्टीही कमकुवत झाली
अ‍ॅसिड पोटात गेल्यानं तिची अन्ननलिका जळाली 
सुरुवातीला तिला भायखळ्याच्या मसिना रुग्णालयात दाखल केले
प्रकृती बिघडल्यानंतर तिला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले 
दररोज तिला पाच ते सहा बाटल्या रक्त चढवण्यात येत होत्या.
पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय