पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्येचा प्रयत्न

 Dalmia Estate
पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्येचा प्रयत्न

मुलुंड - पोलीस ठाण्यातच एका आरोपीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आलीये. ही घटना मुलुंड पोलीस ठाण्यात घडली आहे. जाहिद मेहराज असं या आरोपीचं नाव आहे. गुरुवारी बाथरुममध्ये जाऊन मेहराजनं शर्टच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला तात्काळ अग्रवाल रुग्णालयात नेलं. पुढील उपचारांसाठी त्याला जे. जे. रुग्णालयात हरवण्यात आलंय. गाड्यांमधील कारटेप चोऱ्यांबद्दल त्याला अटक करण्यात आली होती. 

Loading Comments