SHARE

मुंबईला हादरवून सोडणाऱ्या 1993 सालच्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी विशेष टाडा न्यायालयाने दोषी ठरवलेल्या सर्व सहा आरोपींना कठोरात कठोर शिक्षेची मागणी सरकारी पक्षाने केली आहे. 16 जूनला या प्रकरणी निकाल देत विशेष टाडा न्यायालयाने अबू सालेम, मुस्तफा डोसा, ताहीर मर्चंट, करीमुल्ला खान, फिरोझ अब्दुल, राशीद खान या सातपैकी सहा आरोपींना कट रचणे आणि हत्येच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवले होते.

सोमवारी या आरोपींच्या शिक्षेवर सुनावाणी सुरू झाल्यानंतर सीबीआयचे विशेष सरकारी वकील दीपक साळवी यांनी सर्व सहा आरोपींना कठोरात कठोर शिक्षा सुनावण्याची मागणी केली.

यावेळी दोषी फिरोज खानचे वकील वहाब खान यांनी अर्ज करुन शिक्षा कमी करण्यासाठी तीन साक्षीदारांच्या पडताळणीची मागणी केली. त्यांची मागणी न्यायालयाने मान्य केली आहे.

मुस्तफा डोसाचा वकील 25 जूनपर्यंत मुंबईबाहेर असल्याने त्याच्या वकिलाने 25 जूननंतर युक्तीवाद करण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. त्यातच बचाव पक्षाच्या वकिलांनी युक्तीवादाची तयारी करण्यासाठी दोन अठवड्यांची मुदत मागितली. परंतु हा खटला महत्त्वाचा असल्याचे सांगत न्यायालयाने ही मागणी फेटाळाली. बचाव पक्षाने आदेशाची संपूर्ण प्रत मागितली असून मंगळवारी त्यावर सुनावाणी होणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या