‘पबजी गेम’ धोकादायक, सायबर सेलच्या पोलिसांकडून निर्देश

‘पबजी’ खेळू न दिल्यामुळे मुंबईच्या कुर्ला परिसरातील एका १९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे पुढे आले होते. यावरून हा गेम तितकाच धोकादायक असल्याचे पोलिसांकडून सादर करण्यात येणार्या अहवालात जरी म्हटले असले. तरी मूळात अशा प्रकारच्या आँनलाईन गेमबाबत भारतात कोणताही कायदा नाही.

‘पबजी गेम’ धोकादायक,  सायबर सेलच्या पोलिसांकडून निर्देश
SHARES

गुजरातमध्ये 'पबजी'वर बंदी घालण्यात आल्यानंतर महाराष्ट्रात ही या खेळावर बंदी घालण्यात यावी. याबाबत एप्रिलमध्ये एका महिलेने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेनंतर न्यायालयाने महाराष्ट्राच्या सायबर सेल पोलिसांना शहा निशा करून योग्य ते निर्देश जारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यावर 'पबजी'  हा गेम  हिंसक असून तरुणांसाठी धोकादायक असल्याचे निर्देश महाराष्ट्र सायबर पोलिस सेलने दिले असले. तरी अशा प्रकारच्या आँनलाईन गेमवर कारवाई करण्याबाबत कोणताही कायदा नसल्यामुळे पोलिसांना कारवाई करण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे.


‘पबजी गेम’ संदर्भात याचिका दाखल

ऑनलाइन मोबाईल गेममध्ये  ‘पबजी’ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असताना तरुणांवर याचा विपरीत परिणाम होताना दिसत आहे. ते पाहता अनेक देशांनी मोबाईल गेम बाबत कायद्यात तशी नव्याने तर्तूद केली आहे. भारतात सध्या पबजी या हिसंक गेमने मुलांना वेड लावलंय. यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पबजी गेमविरोधात ११ वर्षीय मुलातर्फे आईने एप्रिलमहिन्यात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. याचिकेतून पबजी गेमवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. या याचिकेवर हायकोर्टाने राज्याच्या सायबर सेल विभागाला शहानिशा करून योग्य ते निर्देश जारी करावेत, अशी सूचना दिली.


'हिंसक गेम' बाबत कायदा नाही

राज्य सायबर सेलच्या पोलिसांनीया हिंसक गेमबाबत काही मुद्दे उपस्थित केले आहे. त्यामध्ये हा गेम हिंसक आहे. तसेच या खेळाच्या आहारी जाणारा तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत. या खेळाच्या आहारी गेलेल्या तरुणांना सामाजिक भाण रहात नाही. त्याच बरोबर या खेळाचा परिणाम त्यांच्यावर स्वभावावर वारंवार दर्शवतो. अशा गेममुळे अनेक मुले मानसिक तणावाखाली गेल्याचे ही निदर्शनास आले आहे. नुकतेच ‘पबजी’ खेळू न दिल्यामुळे मुंबईच्या कुर्ला परिसरातील एका १९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे पुढे आले होते. यावरून हा गेम तितकाच धोकादायक असल्याचे पोलिसांकडून सादर करण्यात येणार्या अहवालात जरी म्हटले असले. तरी मूळात अशा प्रकारच्या आँनलाईन गेमबाबत भारतात कोणताही कायदा नाही. ‘ब्यू गेम’ प्रमाणे या गेममध्ये तरुणांना शारीरिक इजा पोहचवण्या संदर्भात प्रवृत्त केले जात नाही. तसेच पोलिसांना फक्त भारतात पुस्तकातील वादग्रस्त मथळा आणि प्रक्षेपणावर ठराविक कलमांतर्गत कारवाई करता येत असल्याने अशा गेमवर कारवाई करण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे.  


हिसंक गेमबाबत अटी शर्ती ठरवाव्यात

विशेष म्हणजे अशा प्रकारच्या गेमवर थेट बंदी आणल्यास त्याकडे अनेकांचे लक्ष वेधले जाण्याच्या शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या गेममध्ये हिंसक गोष्टी वगळून काही बदल घडवता येऊ शकतात. तसेच अशा प्रकारच्या हिंसक गेमबाबत एक कमिठी स्थापित करून त्या द्वारे अशा प्रकारच्या हिंसक गेम संदर्भात अटी आणि कायदा ठरवून दिल्यास, पोलिसांना कारवाई करणे सोपे जाऊ शकते असे मत पोलिसांकडून सादर करण्यात येणाऱ्या निरीक्षणात वर्तवण्यात आले आहे.  नेपाळ आणि दुबई सारख्या देशांमध्ये या खेळावर बंदी घालण्यात आली आहे.

हेही वाचा

अभिनेता करण सिंग ओबेराॅय बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा