राहुल राजचा पुन्हा धिंगाणा


राहुल राजचा पुन्हा धिंगाणा
SHARES

सांताक्रूझ - प्रत्युषा आत्महत्या प्रकरणानंतर राहुल राज सिंग आणखी एका वादात सापडलाय. दारूच्या नशेत गाडी चालवल्या प्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी राहुल राज सिंगला अटक केली होती. तंसच राहुलकडे गाडीचा परवानादेखील नव्हता. त्यावेळी राहुलसोबत त्याची मैत्रीण सलोनी शर्माही होती. राहुलला अटक केल्यानंतर सलोनी पोलिसांशी हुज्जत घालू लागली. तसंच राहुलवर कारवाई केली तर वरिष्ठांना तक्रार करण्याची धमकीही दिल्याचं मुंबई पोलीस प्रवक्ते अशोक दुबे यांनी सांगितलं.

गेल्याच आठवड्यात ओशिवरातल्या हॉटेलमध्ये अभिनेत्रीचा विनयभंग केल्याविरोधात गुन्हा दाखल आहे. तर आणखी एका अभिनेत्रीला फसवल्याबद्दलही जुलैमध्ये राहुलविरोधात गुन्हा दाखल आहे. अभिनेत्री प्रत्युषा बेनर्जीच्या आत्महत्येप्रकरणी याआधीच राहुल विरोधात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय