लोहमार्ग पोलिसांची भिकाऱ्यांवर कारवाई, घातपाताबाबत रेल्वे पोलीस सतर्क


लोहमार्ग पोलिसांची भिकाऱ्यांवर कारवाई, घातपाताबाबत रेल्वे पोलीस सतर्क
SHARES

हार्बर मार्गावरील रे रोड स्थानकापासून 300 फूट अंतरावरील रेल्वे रुळावर मंगळवारी रात्री लोखंडी तुकडा आढळल्याने याविरोधात दोन आरोपींना अटक करण्यात वडाळा लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. सदरील घटनेतील आरोपी गर्दुल्ले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असली तरी या घटनेनंतर पुन्हा एकदा रेल्वे आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय. बी. सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी वडाळा रेल्वे पोलीस ठाणे हद्दीतल्या 13 रेल्वे स्थानकावरील भिकाऱ्यांवर वडाळा पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात आली.

या कारवाईत एकूण 18 (14 पुरूष, 4 महिला) भिकाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी करून त्यांंच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांना रिमांडसह कुर्ल्यातल्या बेगर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यातील 10 जणांना सोडून दिले असून त्यापैकी 8 जणांना चेंबूरच्या बेगर होम येथे ठेवण्याचे आदेश दिले. रेल्वे पोलिसांची धडक कारवाई पाहून रेल्वे स्थानकावर बस्तान मांडणाऱ्या अनेक भिकाऱ्यांनी रेल्वे स्थानकावरून पलायन केले आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा