भाजप कार्यकर्त्यांकडून पोलिसाला मारहाण, आरोपींना सोडवण्यासाठी 'या' आमदारानं केला फोन


भाजप कार्यकर्त्यांकडून पोलिसाला मारहाण, आरोपींना सोडवण्यासाठी 'या' आमदारानं केला फोन
SHARES

पवईच्या हिरानंदानी गॅलेरिया जवळ किरकोळ अपघाताच्या कारणास्तव तीन व्यक्ती एका महिलेबरोबर हुज्जत घालत होते. दरम्यान पवई पोलिस गस्त घालणारे हवालदार नितीन करमोडे तेथे पोहचले असता पोलिस ठाण्यात चला असं सांगून तीन अज्ञात व्यक्तिंना रिक्षात घेवून जात असताना या व्यक्तिंनी ऑनड्यूटी पोलिसांवर हल्ला करत मारहाण केली आणि हिरानंदानी गँलेरीया येथून पळ काढला.

हेही वाचाः- बर्ड फ्लू धोकादायक, राज्यात हायअलर्ट घोषित करण्याची गरज- राजेश टोपे

भाजपचे कार्यकर्ते ट्रिपल सीट प्रवास करताना. त्याचा किरकोळ अपघातावरून एका महिलेशी वाद झाला. या दरम्यान गस्तीवर असलेले पोलिस हवालदार नितीन करमोडे तेथे पोहचले असता. त्यांनी तेथील सर्वांना पोलिस ठाण्यात जाऊन वाद मिठवण्याची विनंती केली. त्यानुसार तिनही आरोपी पोलिसांच्या गाडीत बसले. त्यातील एका आरोपीने हातातील कड्याने थेट खैरमाडे यांच्यावरच हल्ला चढवला. या हल्यात खैरमाडे यांचा ओठ फाटला.  या प्रकारानंतर या तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून एक जण फरार आहे. पोलिसांना मारहाण केल्या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात आरोपींवर ३५३ , ३३२ , ५०४ , ३४ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन तिवारी ( १८) एक अल्पवयीन  या दोन जणांना अटक करण्यात आले असून दिपू तिवारी हा आरोपी फरार असून पवई पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत.

हेही वाचाः- वेब सिरिजद्वारे मनसे मांडणार मुंबईतील खऱ्या समस्या

 विशेष म्हणजे या आरोपींना माणुसकिच्या नात्याने सोडा असा विनंतीचा फोन चक्क भाजप आमदार राम कदम यांनी केला.  कदम यांची ही आॅडिओ क्लिप सध्या सोशल मिडियावर प्रचंड वायरल होत आहे. राम कदमांचे हे संभाषण ऐकून सामान्य नागरिक देखील संभ्रमात पडली आहे. 'तुम्हाला झालेल्या मारहाणीचे मी समर्थन करत नाही. पण माणूसकीच्या दृष्टीकोनातून आणि त्या तिघांच्या भविष्याचा विचार करा. त्या तिघांच्या करिअरचा प्रश्न आहे. त्यांचं लग्नही झालेलं नाही,' असं म्हणत राम कदमांनी तक्रार मागे घेण्याची मागणी केली आहे. पोलिस कर्मचा-यांशी झालेल्या या संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. 'त्या दिपूनं जे केलं ते चूकच आहे. त्याचं समर्थन मी करत नाही. पण आता ज्या पद्धतीने कोर्टात केस स्टँड झाल्याचे आपण पाहिलेच आहे. त्याच्या दोन थोबाडीत मारा, पण आपसात ही केस सोडवण्याचा प्रयत्न करा,' अशी विनंती राम कदम यांनी केली आहे. दरम्यान, खैरमाडे यांनी हा महाराष्ट्र पोलिसांच्या आणि माझ्या स्वतःच्या स्वाभिमानाचा प्रश्न असून असं करणं योग्य ठरणार नाही, अशी ठाम भूमिका घेत राम कदम यांची विनंती अमान्य केली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा