मुंबईतील धक्कादायक घटना, पोलिस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा

महिलेला मारहाण करत, शारिरीक संबध ठेवण्यासाठी धमकावल्याचेही पीडित मुलीने तक्रारीत केला आहे.

मुंबईतील धक्कादायक घटना, पोलिस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा
SHARES

फेसबुकवर मैत्री झालेल्या २३ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमीष दाखवून तरुणीचा वारंवार उपभोग घेणाऱ्या मुंबईतल्या एका पोलिस उपनिरीक्षकावर मुंबईच्या माता रमाबाई आंबेडकर(एमआरए) मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ऐवढ्यावरच न थांबता आरोपीने  महिलेला मारहाण करत, शारिरीक संबध ठेवण्यासाठी धमकावल्याचेही पीडित मुलीने तक्रारीत केला आहे.

हेही वाचाः- माहीम परिसरात फुटली जलवाहिनी; 'या' परिसरात पाणीपुरवठा नाही

कुर्लाच्या विनोबा भावे मार्ग पोलिस ठाण्यात सध्या आऱोपी प्रदीप साहेबराव हळवे हे कार्यरत आहेत. गोरेगाव येथे राहणाऱ्या २३ वर्षीय तक्रारदार तरूणीसोबत हळवेची फेसबुकवर ओळख झाली. दोघे एकमेकांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. आरोपीने लग्नाचे आमीष दाखवून पीडित तरुणीवर फोर्ट येथील विजय लॉजवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर जानेवारी २०२० ते फेब्रुवारी २०२० या कालावधीत आरोपीने तिला मारहाण केली, तसेच धमकावले. अखेर लग्नास नकार दिल्यानंतर पीडित तरुणीने नुकतीच मुंबई पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार याप्रकरणी एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३७६(बलात्कार),३२३( मारहाण) व ५०६ (धमकावणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाची माहिती आरोपी काम करत असलेल्या विभागातील वरिष्ठांना देण्यात आल्याचे अधिका-याने सांगितले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा