मानखुर्दमधील अपक्ष उमेदवारावर बलात्काराचा गुन्हा

१३ वर्षीय मुलीला शिष्यवृत्ती मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार पीडित मुलीला त्यांनी घरी बोलवले होते. त्यावेळी सिराज यांनी मुलीला धमकावत तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केले.

SHARE

मानखुर्द-शिवाजी नगर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी उभे असलेल्या सिराज शेख यांच्यावर १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सिराज शेख हे या आधी त्या ठिकाणचे नगरसेवक होते.  सिराज यांना अद्याप अटक करण्यात आली नसून पोलिस अधिक तपास करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुदर्शन पैठणकर यांनी दिली.

सिराज यांनी काही दिवसांपूर्वी त्याच परिसरात राहणाऱ्या १३ वर्षीय मुलीला शिष्यवृत्ती मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार पीडित मुलीला त्यांनी घरी बोलवले होते. त्यावेळी सिराज यांनी मुलीला धमकावत तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. तसंच याबाबत कुणालाही न सांगण्यासाठी तिच्यावर दबाव टाकल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी मुलीने या घटनेची माहिती घरातल्यांना दिल्यानंतर मुलीच्या घरातल्यांनी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच सिराजने पळ काढला असल्याचं कळतं.  या प्रकरणी पोलिस सिराज यांच्या मागावर असून त्याचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुदर्शन पैठणकर यांनी सांगितले.हेही वाचा -

तिकिटांच्या काळा बाजारामुळे मध्य रेल्वेला ६१ लाखांचा तोटा

३२२ पीएसआयच्या भरतीला न्यायालयाकडून हिरवा कंदील?
संबंधित विषय
ताज्या बातम्या