मुंबईत बलात्कार-विनयभंगाचे गुन्हे वाढले


मुंबईत बलात्कार-विनयभंगाचे गुन्हे वाढले
SHARES

मुंबई - मुंबईमध्ये बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यामध्ये वाढ झाल्याची माहिती प्रजा फाऊंडेशन या संस्थेनं दिलीय. प्रजा फाऊंडेशनच्यावतीनं मुंबईतील पोलिसिंग आणि कायदा सुव्यवस्थेबाबत वार्षिक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला त्यावेळी ही माहिती समोर आलीय. गेल्या पाच वर्षांत 2011 ते 2015-16 या कालावधीत बलात्काराच्या नोंदणीत 289 टक्क्यांनी तर विनयभंगाच्या नोंदण्या 287 टक्क्यांनी वाढल्यात. प्रजा फाऊंडेशनने 25 हजारांहून अधिक घरांचे सर्वेक्षण केले आहे. त्यात स्त्रिया आणि मुलांच्या सुरक्षितेबाबत चिंता वाढल्याचे आढळून आलंय. राज्य पोलीस प्राधिकरणाच्या बाबतीतही अहवालात तिच स्थिती समोर आलीय. तसेच राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणासाठी समिती स्थापन करण्यात आलीय पण अधिकृत कार्यालय उपलब्ध नसल्याची माहिती प्रजाचे प्रकल्प संचालक मिलिंद म्हस्के यांनी दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा