• सामूहिक बलात्कारप्रकरणी 5 अटकेत
SHARE

मालाड - एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पाच नराधमांना पोलिसांनी अटक केलीय. यातले चार जण कॉलेजचे विद्यार्थी असून एक जण रिक्षाचालक आहे. ही मुलगी चिंचोली फाटकजवळील गोविंदनगरमध्ये रेल्वेमार्गालगत राहात होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 21 ऑक्टोबरपासून ही मुलगी अचानक गायब झाली. शोधाशोध केल्यानंतरही मुलगी सापडत नसल्यानं कुटुंबियांनी दिंडोशी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. मुलगी 14 वर्षांची असून गतीमंद असल्याची माहितीही कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. तेव्हा पोलिसांनी आरोपींविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करत मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा 27 ऑक्टोबरला अचानक त्याच परिसरात ही मुलगी आढळली. त्यानंतर पोलिसांनी तिला शताब्दी रुग्णालयात तपासणीसाठी नेले असता, ती गर्भवती असल्याचं स्पष्ट झालं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या