भोंदूबाबाचा गायिकेवर बलात्कार, कांदिवलीतील घटना

घरातील समृद्धी आणि व्यावसायिक वृद्धीच्या आड तुझ्या शरीरातील अपवित्र आत्मा येत असल्याची भिती दाखवत एका भोंदूबाबाने गायिकेवर (Singer) बलात्कार (rape)केल्याची घटना कांदिवली पश्चिम (Kandivali west) मधील चारकोपमध्ये घडली.

SHARE

घरातील समृद्धी आणि व्यावसायिक वृद्धीच्या आड तुझ्या शरीरातील अपवित्र आत्मा येत असल्याची भिती दाखवत एका  भोंदूबाबाने गायिकेवर (Singer) बलात्कार (rape) केल्याची घटना कांदिवली पश्चिम (Kandivali west) मधील चारकोपमध्ये घडली. या प्रकरणी पोलिसांनी उमेश रमाशंकर पांडे या भोंदू बाबाला अटक केली आहे.

पीडीत महिला गायिका (Singer) असून ती रिमिक्स अल्बमसाठी काम करते. ती चारकोपमध्ये संगीतकार पतीसह भाड्याच्या घरात राहते.  उमेश रमाशंकर पांडे हा पण चारकोप (charkop) मध्ये राहतो. घरात सुख समृद्धी आणि शांती राहावी यासाठी दोघांनी  घरात पूजापाठ करण्याचं ठरवलं. दोघेही  गृहपूजेसाठी पुजारी शोधत होते. यावेळी त्यांची उमेश पांडेशी ओळख झाली.रविवारी पांडेला पूजेसाठी घरी बोलावलं होतं.  पूजापाठ झाल्यानंतर भोंदूबाबा उमेश पांडेनं तिच्या पतीला घराबाहेर जाण्याचं सांगितलं. पती घराबाहेर गेल्यानंतर महिला घरी एकटीच असल्याचा फायदा घेऊन पांडेने तिच्यावर बलात्कार (rape) केला. तिचा पती (husband) काही वेळाने घरी आल्यानंतर घडलेला प्रकार तिने सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी (police) आरोपी उमेश पांडेला अटक केली. पीडित महिला आणि आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. मंगळवारी आरोपीला न्यायालयासमोर (court) हजर करण्यात आलं. न्यायालयानं आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.


हेही वाचा -

एजाज लकडावालाच्या पोलिस कोठडीत वाढ

एचडीआयएलवर आणखी एक गुन्हा दाखल 200 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप
संबंधित विषय
ताज्या बातम्या