'पोलिस दिदी अभियाना'मुळे बलात्कारी बाप अटकेत

पोलिस दिदी कार्यक्रमांतर्गत अल्पवयीन मुलींना "गुड टच व बॅड टच" ची माहिती दिली जाते. याच माहितीच्या आधारे तरुणीन वडिलांकडून अशा प्रकार होणाऱ्या शोषणाची माहिती पोलिसांना दिल्यानंतर हा प्रकार पुढे आला.

'पोलिस दिदी अभियाना'मुळे बलात्कारी बाप अटकेत
SHARES

अल्पवयीन मुलीच्या अज्ञानतेचा फायदा घेत तिच्यासोबत अश्लील कृत्य करणाऱ्या नराधम बापाचा पोलिस दिदी कार्यक्रमामुळे पर्दाफाश झाला आहे. पोलिस दिदी कार्यक्रमांतर्गत अल्पवयीन मुलींना "गुड टच व बॅड टच" ची माहिती दिली जाते. याच माहितीच्या आधारे तरुणीन वडिलांकडून अशा प्रकार होणाऱ्या शोषणाची माहिती पोलिसांना दिल्यानंतर हा प्रकार पुढे आला.


'पोलिस दिदी' कार्यक्रमामुळे प्रकार उघड

पीडित मुलगी ही आग्रीपाडा परिसरात आपल्या कुटुंबासह राहते. पीडीत मुलगी त्याच परिसरातील एका शाळेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेते. दरम्यान मुंबईत अल्पवयीन मुलींच्या बालबुद्धीचा फायदा घेऊन त्यांच्याशी अश्लील चाळे करण्याचं प्रमाण मागील काही वर्षांत वाढलं होतं. या गुन्ह्यांवर आळा बसावा म्हणून राज्यातील प्रत्येक शाळेत आठवड्यातून एकदा 'पोलिस दिदी' कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाचं उद्देश म्हणजे अल्पवयीन मुलींना त्यांना चुकीच्या पद्धतीनं हात लावणाऱ्यांपासून कसं सावध रहावं, हे सांगितलं जात. त्यानुसार पीडीत मुलीचा शाळेत काही महिला पोलिसांना पाठवून मुलींना गुड टच व बँड टचची माहिती पोलिसांनी दिली.


आणि प्रकार उघड

या माहितीवरून एका 14 वर्षीय मुलीने आपले वडिलच आपल्यासोबत असे कृत करतं असल्याचं सांगितलं. त्यानंतर एक स्वयंसेवी संस्था त्या अल्पवयीन मुलीच्या मदतीला धावून आली आणि पोलिसांनी त्या नराधम बापावरच गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा