‘आम्हाला फासावर चढवा’ निलंबित पोलिस शिपायाचे मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र

आम्ही हे एन्काऊंटर वैयक्तिक स्वार्थापोटी केलं होतं का ? आम्ही यंत्रणेचे बळी ठरलो आहोत का ? असा सवाल माझ्यासह माझ्या कुटुंबीयांना पडत असतात

‘आम्हाला फासावर चढवा’ निलंबित पोलिस शिपायाचे मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र
SHARES

२००६ साली झालेल्या लखनभैय्या एन्काऊंटर प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या निलंबित पोलिस शिपाई तानाजी देसाई यांनी “आम्हाला या प्रकरणात फाशीची शिक्षा देण्यात यावी. असे पत्र मुंबई पोलिस आयुक्तांना लिहिले आहे. या पत्राची सध्या मुंबई पोलिस आयुक्तालयात जोरदार चर्चा आहे. 

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा साथीदार असल्याच्या संशयावरून लखनभैयासह त्याचा साथीदार अनिल भेडा याला नोव्हेंबर २००६मध्ये प्रदीप शर्मा यांच्या पथकाने वाशी येथून उचलले होते. त्यानंतर वर्सोवा येथील नाना-नानी पार्कजवळ लखनभैयाचे एन्काऊंटर करण्यात आले होते. या घटनेनंतर लखनभैयाच्या भावाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. २०१३ पासून हे प्रकरण मुंबई हायकोर्टात प्रलंबित असल्याने उद्विग्न होऊन यातील निलंबित पोलिस शिपाई देसाई यांनी पोलिस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. देसाई ७ जानेवारी २०१० पासून या प्रकरणात जेलमध्ये आहेत. आपल्याला या प्रकरणात आता जेलमध्ये १० वर्ष काढावी लागली असून आम्ही हे एन्काऊंटर वैयक्तिक स्वार्थापोटी केलं होतं का ? आम्ही यंत्रणेचे बळी ठरलो आहोत का ? असा सवाल माझ्यासह माझ्या कुटुंबीयांना पडत असतात .असंही देसाई यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

सध्या देसाई हे पुण्यातील येरवडा कारागृहात आहेत. २०१३ साली त्यांना सेशन्स कोर्टाने या प्रकरणी १३ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या विरोधात त्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलून ती प्रलंबित असल्याच्या उद्वेगातून देसाई यांनी हे पत्र लिहिलं आहे. २०१५ साली देवेंद्र फडणवीस सरकारनं सेशन्स कोर्टाच्या निर्णयाला ६ महिने स्थगिती दिली होती. मात्र, २१ डिसेंबर २०१५ रोजी मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. छोटा राजन टोळीचा सदस्य असलेल्या रामनारायण गुप्ता उर्फ लखनभैय्याचा याचा ११ नोव्हेंबर २००६ रोजी कथित एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला होता.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा