समीर वानखेडेंना दिलासा, अटक करण्यापूर्वी...

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

समीर वानखेडेंना दिलासा, अटक करण्यापूर्वी...
SHARES

क्रूझ ड्रग्ज प्रकरणी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. वानखेडे यांना अटक करण्यापूर्वी मुंबई पोलिसांना तीन दिवसांची नोटीस द्यावी लागेल, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

आर्यन खान ड्रग्स प्रकरणात एनसीबी विभागीय संचालक समीर वानखेडे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर आणि त्यांच्या कुटुंबावर विविध आरोप केले आहेत.

नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपानंतर त्यांच्या विरोधात चार तक्रारी देखील दाखल झाल्या आहेत. त्यामुळे वानखेडे यांची उच्च न्यायालयात धाव घेत आपल्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल झाल्यास त्याचा तपास सीबीआयनं करण्याची आणि कठोर करवाईपासून संरक्षण देण्याची मागणी केली होती.

उच्च न्यायालयानं यावर म्हटलं की, या प्रकरणाचा तपास सीबीआय न करता मुंबई पोलिसच करतील. पण वानखेडे यांना अटक करताना ३ दिवसाआधी नोटीस द्यावी.

दरम्यान, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी तक्रार केली आहे. मागासवर्गीय असल्यामुळे त्रास दिला जात असल्याची तक्रार समीर वानखेडे यांनी केली आहे. मागासवर्गीय असल्यामुळे आपल्यावर खोटे आरोप केले जात आहेत.

समीर वानखेडेंनी नागरी सेवा उत्तीर्ण होताना दाखवलेले जात प्रमाणपत्र हे खरे असून बदनामी करण्यासाठी कटकारस्थान रचले जात असल्याची तक्रार त्यांनी केली आहे.

समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडे यांनी बुधवारी नवाब मलिक यांच्या विरोधात तक्रार घेऊन राष्ट्रीय महिला आयोगाकडे धाव घेतली.

यास्मिननं सांगितलं की, मलिक त्यांना ऑनलाइन धमक्या देत आहे. यास्मिन वानखेडे यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे या प्रकरणी तक्रार नोंदवण्याची विनंती केली. त्यांनी आयोगाला यासंदर्भात एक पत्र लिहिलं आहे.

माझ्यावर नवाब मलिक यांनी अनेक खोटे आरोप केले आहेत. माझ्या भावाच्या प्रामाणिक कर्तव्यात अडथळा आणण्यासाठी नवाब मलिक माझ्या कुटुंबावर आणि माझ्यावर खोटे आणि निराधार आरोप करत आहेत. नवाब मलिक माझ्या सोशल मीडिया हँडलवरून बेकायदेशीरपणे फोटो काढत असल्याचं यास्मिन वानखेडे यांनी म्हटलं आहे.



हेही वाचा

क्रुझ ड्रग्ज प्रकरण : आर्यन खानचा जामीन मंजूर, शाहरुख खानला दिलासा

क्रांती रेडकरचे मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र, बाळासाहेबांना हे...

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा