पादचारी पुलाची दुरवस्था

 Sham Nagar
पादचारी पुलाची दुरवस्था
पादचारी पुलाची दुरवस्था
पादचारी पुलाची दुरवस्था
पादचारी पुलाची दुरवस्था
पादचारी पुलाची दुरवस्था
See all

जोगेश्वरी- जोेगेश्वरी पूर्व आणि पश्चिमेला जाणाऱ्या रेल्वे पुलाच्या पायऱ्यांची दुरवस्था झाली आहे. हा पुल रेल्वे प्लॅटफॉर्म १ ते ४ ला जोडल्यामुळे ट्रेन पकडण्यासाठी या पुलाचा वापर होतो. मात्र या पुलाच्या पायऱ्याची लादी तुटल्यामुळे प्रवासी पडण्याची शक्यता आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरुन पश्चिम दिशेला बाहेर पडताना सुद्धा अनेक पायऱ्यांच्या लाद्या, सिमेंट,पेव्हर ब्लॉक निघाले आहे. रेल्वे प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करुनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवासी राकेश नेहता यांनी केला आहे.तर लवकरात लवकर पायऱ्यांची डागडुगी करु असे आश्वासन स्टेशन मास्टर आर.के.प्रसाद यांनी दिलेे.

Loading Comments