रिक्षा आणि बसच्या अपघातात दोघांचा मृत्यू, तीन गंभीर


रिक्षा आणि बसच्या अपघातात दोघांचा मृत्यू, तीन गंभीर
SHARES

मालाडच्या मालवणी परिसरात रिक्षा आणि बसच्या गंभीर अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी मालवणी पोलिस ठाण्यात अपघाती गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या दुर्घटनेतील रिक्षा चालक हा नशेत रिक्षा चालवत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.


अॅटलांटिक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

मालाडच्या मार्वे रोडवर नशेत भरधाव वेगात रिक्षा चालवणाऱ्या चालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने रिक्षाने बेस्ट बसला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात रिक्षातील दोघांचा जागीच मृत्यू झाला. सतीश शोधे आणि मोहम्मद जुबेर खान अशी या दोन मृतांची नावे आहेत. हे दोघेही मालवणी गेट नं 8 परिसरात राहणारे आहेत. या दोघांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात नेण्यात आला आहे. तर इतर तीन जखमींना मालवणीच्या अॅटलांटिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.



हेही वाचा

विद्यार्थिनीच्या विनयभंगप्रकरणी शिक्षकास अटक


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा