सीजे हाऊसप्रकरणात हवाला ऑपरेटर महिलेला अटक


SHARE

वरळी येथील जमीन व्यवहार प्रकरणी ईडीकडून नुकतीच चौथ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. ईडीकडून या अगोदर अटक करण्यात आलेल्या रणजित बिंद्रा या आरोपीच्या जबानीवरून हवाला ऑपरेटर रिंकू देशपांडे या महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा हस्तक इक्बाल मिर्ची यांची भागीदारी होती. त्यामुळे या प्रकरणाकडं सर्वांचं लक्ष लागून आहे.  

वरळीतील सीजे हाऊसमधील त्यांच्या मालकीच्या दोन फ्लॅटच्या खरेदी व्यवहारबाबत ईडी सध्या चौकशी करत आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा खास हस्तक असेलेल्या मिर्चीच्या मालकीच्या सीजे हाऊसमधील दोन फ्लॅट पटेल यांनी विकत घेतली असल्याचा अधिकाऱ्यांचा संशय आहे. याप्रकरणात अटक केलेल्या या रणजित सिंग बिंद्रा व हारुण युसूफ या दलालाच्या चौकशीतून ही माहिती पुढे आली आहे. २००७ मध्ये या दोन फ्लॅटचा विकास करार होऊन हस्तांतर करण्यात आले. पटेल यांचे त्या व्यवहारावर सहमालक म्हणून स्वाक्षरी असल्याचं सांगण्यात येत आहे.  मंगळवारी इकबाल मिर्ची याचा खास हस्तक हुमायून मर्चंट याला अटक केल्यानंतर ईडीने रिंकू देशपांडे या महिला आरोपीला अटक केली आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, रिंकू देशपांडे व तिच्या कुटुंबियांचे इकबाल मिर्चीसोबत संबंध होते. वरळी येथील जमिनीच्या व्यवहारात रिंकू देशपांडे हिने रणजित बिंद्रा याला ४० कोटी रुपयांची दलाली मिळवून देण्यासाठी मदत केली होती. वरळी येथील व्यवहार करण्यात येणाऱ्या इमारतीत काही बनावट भाडेकरूंना फक्त कागदावर दाखविण्यात आलं होतं. अटक आरोपी रणजित बिंद्रा याने ईडी चौकशीत कबुली दिली आहे, की ३ जागांच्या व्यवहारासाठी इकबाल मिर्चीला तो लंडनमध्ये भेटला होता. यासाठी सन ब्लिक रियल इस्टेट या कंपनीचा ब्रोकर असल्याचे सांगत तो इकबाल मिर्चीला भेटला होता. रिंकू देशपांडे ही मोठी हवाला ऑपरेटर असल्याचं ईडी चौकशीत रंजित बिंद्रा याने म्हटलं आहे.हेही वाचा  -

मुलाकडून आईच्या प्रियकराची हत्या

चेंबूर दंगलीप्रकरणी ३३ अटकेत, २०० जणांवर गुन्हा
संबंधित विषय
ताज्या बातम्या