बेस्ट चालकाला केबिनमध्ये घुसून मारहाण. व्हिडिओ व्हायरल...

गोरेगाव - गोरेगाव पश्चिममध्ये मुख्य रस्त्यावर बेस्ट बस ड्रायव्हर आणि टॅक्सीचालकामध्ये सोमवारी सकाळी हणामारी झाली. आणि या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बेस्ट बसचालकाला टॅक्सी ड्रायव्हर मारहाण करताना दिसत आहे. 201 क्रमांकाची ही बेस्ट बस शिवडीतील प्रबोधिनी ठाकरे उद्यान ते गोरेगाव या मार्गावर चालते. सोमवारी सकाळी या रस्त्यावर ट्रॅफिक असल्यामुळे या बसचा धक्का टॅक्सीला लागला. यामुळे संतापलेल्या टॅक्सी ड्रायव्हरने बस ड्रायव्हरच्या केबिनमध्ये घुसून त्याला मारायला सुरुवात केली. एका टॅक्सी चालक तर थेट फुटपाथवरचा पेव्हर ब्लॉकच घेऊन मारण्यासाठी पुढे सरसावला. 

Loading Comments