SHARE

घाटकोपर - रेल्वे स्थानकाजवळील हिराचंद देसाई रोड येथे पुन्हा एकदा फेरीवाल्यांची दादागिरी समोर आली आहे. कॉलेजमधून घरी जात असलेल्या निलेश येवले या विद्यार्थ्याचा फुटपाथवर अनधिकृतपणे धंदे लावणाऱ्या फेरीवाल्याला धक्का लागला. त्या फेरीवाल्याने निलेशला शिवीगाळ केली. दोघांमध्ये झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान पुढे मारहाणीत झाले. या मारहाणीत निलेशच्या चेहऱ्याला आणि मानेला दुखापत झाली. निलेशवर राजावाडी रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले आहेत. याप्रकरणी फेरीवाल्याला घाटकोपर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या