लोकलमध्ये प्रवाशाला गुंगीचे औषध देऊन लुटले

अनोळखी व्यक्तीने तक्रारदाराला बिस्किट आणि शीतपेय पिण्याची आॅफर केली. आॅफर करणारा त्याच्या पेहराव्यावरून चांगल्या घरातला वाटत होता. त्यामुळे तक्रारदाराने त्याने पुढे केलेले बिस्किट आणि शीतपये घेतले.

लोकलमध्ये प्रवाशाला गुंगीचे औषध देऊन लुटले
SHARES

लांब पल्ल्याच्या एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना गुंगीचं औषध देऊन लुबाडले जाते. पण आता लोकलमध्येही प्रवाशाला गुंगीचं औषध देऊन लुबाडल्याची घटना घडली आहे. बिस्किट खायला देऊन पैसे लंपास केल्याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बिस्किट, शीतपेयातून औषध

तक्रारदार हे विठ्ठलवाडी स्थानक परिसरात राहतात असून ते खासगी कंपनीत काम करतात. ४ जुलै रोजी त्यांनी सीएसएमटीला येण्यासाठी  कल्याणहून फास्ट लोकल पकडली. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने तक्रारदाराला बिस्किट आणि शीतपेय पिण्याची आॅफर केली. आॅफर करणारा त्याच्या पेहराव्यावरून चांगल्या घरातला वाटत होता. त्यामुळे तक्रारदाराने त्याने पुढे केलेले बिस्किट आणि शीतपये घेतले. त्यानंतर प्रवासात तक्रारदार यांना गुंगी येऊ लागली आणि डोंबिवली स्थानक गेल्यानंतर ते बेशुद्ध पडले.


दीड तास बेशुद्ध

 याचाच फायदा घेऊन भामट्याने तक्रारदारांच्या खिशातून पाकिट आणि मोबाइल चोरून पळ काढला. गुंगीचे औषध मिसळलेले बिस्किट खाल्ल्यामुळे तक्रारदार दीड तास बेशुद्ध अवस्थेत होते. दुपारी ५.३० वाजताच्या सुमारास लोकल स्थानकावर पोहचल्यानंतर तक्रारदार यांना जाग आली. त्यावेळी शुद्धीवर आल्यानंतर त्यांना त्यांच्या खिशात मोबाइल आणि पाकिट नसल्याचे आढळून आले.  या प्रकरणी त्यांनी कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.


पोलिसांचं आवाहन

एक्स्प्रेसमध्ये प्रवासादरम्यान भामटे प्रवाशाशी मैत्री करतात. सोबत एकत्र प्रवास करू असे भासवून शीतपेयातून किंवा खाद्यपदार्थात गुंगीचे औषध मिसळून त्यांना लुबाडतात. जर प्रवासादरम्यान कोणी अज्ञात व्यक्त खाद्यपदार्थ देत असल्यास ते खाऊ नये असं आवाहन रेल्वे पोलिसांनी केलं आहे.हेही वाचा -

नायर रुग्णालयातील ३ निवासी डाॅक्टरांना मारहाण

कार्ड क्लोनिंगचे वाढते गुन्हे पोलिसांसाठी डोकेदुखी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा