पोलीसच गुन्हेगार?


पोलीसच गुन्हेगार?
SHARES

वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास गरुड आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करणे वडाळा टीटी पोलिसांना भाग पडले आहे.

वाडाळा टीटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी संजय सोनी यांनी तक्रार केल्यानंतर न्यायालयामार्फत गुन्हा नोंदवण्याचा आदेश पोलिसांना दिला असून 90 दिवसात आरोपपत्र आणि तपास पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. संजय सोनी वडाळा भागात व्हिडिओ पार्लर चालत असल्याची माहिती तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास गरूड यांना मिळाली होती. त्यानुसार गरूड यांनी10 ते 12 पोल‌ीस अंमलदारांसह सोनी यांच्या घरावर कारवाई केली होती. त्यावेळी पोलिसांना काहीही आक्षेपार्ह सापडले नाही. पण तशी नोंद पोलिसांनी केली नव्हती. 

त्यानंतर संजय यांनी पोलिसांवर बेकायदा कारवाईसह आपल्या घरातून 50 हजार रुपये रोख आणि पत्नीचे दोन लाखांचे दागिने लुटल्याचा आरोप करत न्यायालयातही धाव घेतली होती.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा