दहिसरमध्ये SBI बँकेत दरोडा, गोळीबार झाल्यानं परिसरात खळबळ

बँकेत लूटमार करण्याच्या उद्देशानं गोळीबार करण्यात आला आहे.

दहिसरमध्ये SBI बँकेत दरोडा, गोळीबार झाल्यानं परिसरात खळबळ
SHARES

मुंबईच्या दहिसर पश्चिम इथल्या एका बँकेत गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. बँकेत लूटमार करण्याच्या उद्देशानं गोळीबार करण्यात आला आहे. यात एका जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. ही घटना दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.   

एमएचबी पोलिसांचे पथक, डीसीपी विशाल ठाकूर यांच्यासह अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीण पडवळ घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरणाचा तपास करत आहेत. दहिसर इथल्या गुरुकुल बिल्डिंग जीएस रोडवर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ब्रँचमध्ये ही घटना घडली आहे.

या दरोड्यात आरोपी किती रक्कम घेऊन फरार झाला याचा तपास पोलीस करत आहेत. बँकेच्या आत झालेल्या गोळीबारात एक व्यक्ती जखमी तर एकाचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

सध्या पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं गोळीबार करणाऱ्यांचा शोध घेत आहेत. सीसीट्वीह कॅमेऱ्यामध्ये दोघेजण कैद झाले असून एकानं सफेद रंगाचं तर दुसऱ्यानं काळ्या रंगाचं शर्ट घातलं होतं. दोघांनीही तोंडाला कपडा बांधल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलं आहे.

बुधवारी दुपारी ३.२७ वाजता हे चोरटे बँकेत आले. त्यांनी बंदुकीचा धाक दाखवला. गोळीबार केला त्यात एक जण जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीला तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

चोरीवेळी त्यांनी केलेल्या गोळीबारामुळे आजूबाजूला असलेल्यांना पोलिसांना लगेचच याबाबत कळवलं. मात्र पोलिस दाखल होईपर्यंत चोरट्यांनी पळ काढला होता. आता या चोरट्यांचा सीसीटीव्हीच्या मदतीनं शोध घेतला जातो आहे.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा