कंत्राटदाराकडे खंडणी मागणारा जेरबंद

 Chembur
कंत्राटदाराकडे खंडणी मागणारा जेरबंद
Chembur, Mumbai  -  

एका कंत्राटदाराकडून 2 लाखांची खंडणी मागणाऱ्या एका आरोपीला बुधवारी आरसीएफ पोलिसांनी अटक केली आहे. निखिल आंग्रे (26) असे या आरोपीचे नाव असून, त्याचा साथीदार सतीश आठवले (32) हा फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

चेंबूर परिसरातील ठेकेदार अख्तर अन्सारी याच्याकडे या आरोपींनी काही दिवसांपूर्वी दोन लाख रुपये खंडणीची मागणी केली होती. अन्सारी यांनी खंडणी देण्यास नकार देताच आरोपींनी दोन दिवसांपूर्वी त्याला त्याच्या घरी जाऊन जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तत्काळ अन्सारी याने आरसीएफ पोलिस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार दाखल केली. त्याआधारे आरसीएफ पोलिसांनी बुधवारी एका आरोपीला अटक केली असून, दुसऱ्या आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.

Loading Comments