SHARE

मध्य रेल्वेच्या दादर स्थानकात धावत्या लोकलमधून उतरताना प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर पडलेल्या बांगलादेशी तरूणाचा जीव रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली.  धावत्या लोकलमधून उलट्या दिशेनं उतरताना प्लॅटफॉर्मवर पडल्यामुळं  हमीद जावेल (२१) या बांगलादेशी नागरिकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर सायन रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरु आहेत.


कशी घडली घटना ?

शनिवारी संध्यकाळी ७ वाजेच्या सुमारास हमीद ठाणे जलद लोकलमधून प्रवास करत होता. लोकल दादर स्थानकात आल्यावर हमीदनं लोकलमधून उलट्या दिशेनं उतरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी लोकलचा वेग जास्त असल्यामुळं हमीदचा तोल जाऊन तो खाली पडला आणि लोकलच्या चाकाकडे ओढला गेला. मात्र, प्लॅटफॉर्मवर गस्तीस असलेले हवालदार मगरे, शिंदे आणि तापोळे यांनी त्याला लोकलच्या चाकाखाली जाण्यापासून वाचवलं.


बांग्लादेश राजदुतावासाकडं कागदपत्रे 

या प्रकरणी गुन्हे शाखा २ चे अधिक तपास करत असून हमीद हा बांगलादेशचा नागरिक असल्यामुळं त्याच्या नातेवाईकांची ओळख पटवण्यासाठी बांगलादेशच्या राजदुतावासाकडं त्याची कागदपत्रे पाठवण्यात आली आहे. त्याचप्रमाणं कागदपत्रांच्या तपासणीनंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती दादर रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रसाद पांढरे यांनी दिली.हेही वाचा -

हत्येच्या खटल्यातील मुख्य साक्षीदाराची हत्या

दाभोलकर हत्या प्रकरण: पांगरकरला २८ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी
संबंधित विषय
ताज्या बातम्या