स्टेट बँकेला फसवल्याप्रकरणी रुबी मिलच्या संचालकाला अटक


स्टेट बँकेला फसवल्याप्रकरणी रुबी मिलच्या संचालकाला अटक
SHARES

स्टेट बॅंक ऑफ इंडियाला २८० कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने रुबी मिलचे संचालक भरत शहा, एसबीआय बँकेचे रिलेशनशीप मॅनेजर व्ही. कदम आणि राजपूत रिटेल लि. कंपनीचे संचालक अजय गुप्ता यांना अटक केली आहे.

अजय गुप्ता आणि त्यांच्या भावाने प्रॉपर्टीच्या चढ्या किमती दाखवून एसबीआयकडून २०११ आणि २०१२ साली कर्ज घेतले. पण ते फेडलेच नाही, असा त्यांच्यावर आरोप आहे.

दादरच्या रुबी मिलमधील तीन माळे विकत घेण्यासाठी त्यांनी बँकेकडून १५५ कोटींचे कर्ज काढले. ते पैसे रुबी मिलचे संचालक भरत शहा यांना दिले. पण या व्यवहारासंदर्भात कुठलाही करारनामा करण्यात आला नाही. या रकमेपैकी ५४ कोटी रुपये शहा यांनी गुप्ताला परत दिले. मात्र उर्वरीत १०१ कोटी त्यांनी स्वत: जवळच ठेवले, अशी माहिती सीबीआयने दिली. 

पवई आणि तारापूर येथील प्रॉपर्टी विकत घेण्यासाठीही गुप्ता बंधूनी एसबीआयकडून कर्ज घेतले. यावेळी या मालमत्तांच्या किमती अव्वाच्या सव्वा दाखवण्यात आल्या. बँकेला सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये देखील फेरफार करण्यात आली होती. बँक कर्मचारी व्ही. कदम यांनी या व्यवहारांची पडताळणी न करताच कर्ज मंजूर केल्याचा दावा सीबीआयने केला आहे.

 


हे देखील वाचा -

प्राध्यापकांना हजारोंचा गंडा घालणारा 'विद्यार्थी'!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा