शिर्डीवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी, रेकी झाल्याचं उघड

दहशतवाद्यांनी शिर्डीत रेकी केल्याची कबुली दिली आहे.

शिर्डीवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी, रेकी झाल्याचं उघड
SHARES

लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुबईवरुन आलेल्या दहशतवाद्यांनी शिर्डीत रेकी केल्याची कबुली दिली आहे. या दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे गुजरात एटीएसनं म्हटलं आहे.

शिर्डी आंतरराष्ट्रीय संवेदनशील देवस्थान असल्यानं याआधीही साई मंदिराला धमकीचे निनावी पत्र तसंच मेल आले आहेत. या दहशतवाद्यांनी शिर्डीचे मूळचे रहिवासी आणि सध्या दिल्लीत वास्तव्यास असणाऱ्या एका हिंदी चॅनेलच्या संपादकांच्या शिर्डीतील घरी आणि दिल्लीतील कार्यालयाची रेकी केल्याची कबुली दिली. या दहशतवाद्यांकडून अवैध हत्यारं आणि स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत.

दरम्यान, यापूर्वीही शिर्डी संस्थानाला धमकीचे फोन आणि मेल आले होते. जगप्रसिद्ध साईमंदिराच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अशातच मोठी यंत्रणा सज्ज आहे. तसेच, दहशतवाद्यांकडून रेकी करण्यात आल्याचं उघड होताच शिर्डीतील सुरक्षा व्यवस्थेत आणखी वाढ करण्यात आली आहे.



हेही वाचा

आईला शिवी दिल्याचा राग, मुंबईत २१ वर्षीय तरुणाची हत्या

राजस्थानवरून मुंबईत हेरॉईन विकण्यासाठी आलेल्या टोळीचा पर्दाफाश

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा