काळवीट शिकारप्रकरणी सलमान खानला दिलासा, पुढील सुनावणी 17 जुलैला!


काळवीट शिकारप्रकरणी सलमान खानला दिलासा, पुढील सुनावणी 17 जुलैला!
SHARES

काळवीट शिकारप्रकरणात दोषी आढळलेल्या सलमान खानला 17 जुलैपर्यंत दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर या प्रकरणाच्या सुनावणीला सोमवारी सलमान खान हजर राहिला होता. मात्र बचाव पक्षाच्या वकिलांनी सुनावणीसाठी पुढची तारीख मागितल्यानंतर या खटल्याची पुढील सुनावणी आता 17 जुलैला होणार आहे.
या सुनावणीसाठी सलमान रविवारीच जोधपूरकडे रवाना झाला होता.


तिसऱ्या दिवशीच जामीन मंजूर

काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर सत्र न्यायालयाने सलमानला दोषी ठरवत 5 वर्षांची शिक्षा आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती. दरम्यान सलमान दोन रात्रच तुरुंगात राहिला. तो तिसऱ्या दिवशी जामिनावर बाहेर आला. यावेळी सलमानसोबत त्याचे मित्र काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी आणि बहिण अलवीरा आणि बॉडीगार्ड शेरा होते.


दोन अटींवर सलमानला जामीन

  • सलमानला 7 मे रोजी कोर्टात हजर राहावं लागणार होतं
  • देश सोडण्यापूर्वी कोर्टाची परवानगी घ्यावी लागणार


काय आहे प्रकरण?

वीस वर्षांपूर्वी ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान आणि अन्य कलाकार राजस्थानमध्ये गेले होते. १-२ ऑक्टोबर १९९८ च्या मध्यरात्री दोन काळवीटांना ठार मारलं होतं. २० या प्रकरणी बिष्णोई समाजातील लोकांनी सलमानसह इतर सहआरोपींविरोधात वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ५१ खाली गुन्हा दाखल करण्यात केला होता. त्यावेळी सलमानवर तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते.


हेही वाचा - 

अखेर 'टायगर' ची सुटका...

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा