काळवीट प्रकरणात दोषी ठरलेल्या सलमानला कोणती शिक्षा होणार?


काळवीट प्रकरणात दोषी ठरलेल्या सलमानला कोणती शिक्षा होणार?
SHARES

जोधपूरमध्ये २० वर्षांपूर्वी झालेल्या काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खान याला दोषी ठरवण्यात आलं आहे. तर अन्य कलाकारांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पण सलमानला आता काय शिक्षा होणार? याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.


चौघांची निर्दोष सुटका

जोधपूर न्यायालयात निकालाच्यावेळी सलमानसह अभिनेता सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे उपस्थित होते. यावेळी सलमान सोडून इतर सहआरोपी असलेल्या चौघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. 


कोणी केला गुन्हा दाखल?

२० वर्षांपूर्वी ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान आणि अन्य कलाकार राजस्थानमध्ये गेले होते. १-२ ऑक्टोबर १९९८ च्या मध्यरात्री दोन काळवीटांना ठार मारलं होतं. २० या प्रकरणी बिष्णोई समाजातील लोकांनी सलमानसह इतर सहआरोपींविरोधात वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ५१ खाली गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी सलमानवर तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते.



हेही वाचा-

'या' कारणामुळे सलमान दोषी आढळला



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा