सराईत चोर सापडला समता नगर पोलिसांच्या तावडीत

 Kandivali East
सराईत चोर सापडला समता नगर पोलिसांच्या तावडीत
Kandivali East, Mumbai  -  

कांदिवली - धमकी, चोरी, महिलांना मारहाण करणे, लूट, विनयभंग असे अनेक गुन्हे दाखल असलेल्या एका आरोपीला समतानगर पोलिसांना अटक केली आहे. आरोपीचं नाव संदीप रामनिहोर यादव उर्फ मुसई (२५) असं आहे. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावणीत आली आहे.

यापूर्वी लूटमारीच्या आरोपाखाली जेलमध्ये असलेल्या संदीपची नुकतीच सुटका झाली होती, अशी माहिती समतानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप यादव यांनी दिली. मात्र जेव्हापासून तो समतानगरच्या हनुमान समर्थवाडी परिसरात राहाण्यासाठी आला, तेव्हापासून त्याच्याविरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्याचेही पोलिसांनी सांगितलं. मात्र 28 मार्चला आरोपी मुसईने दारू पिण्यासाठी त्याच परिसरात राहणाऱ्या बीमलेश मदन बिंदकडून पैसे मागितले होते. मात्र बीमलेशने पैसे दिले नाही. त्यामुळे रागाच्या भरात आरोपी मुसईने बीमलेशला मारहाण केली. त्यावेळी बीमलेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. पीडित बीमलेशच्या आईने आरोपीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर समता नगर पोलिसांनी आरोपी मुसईला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Loading Comments